अकलूज – शिवरत्न शिक्षण संस्था, अकलूज संचलित शंकरराव मोहिते पाटील इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज शंकरनगर-अकलूज व शिवरत्न बास्केटबॉल अकॅडमी अकलूज मधील विद्यार्थी दिनांक 08/11/2025 ते दिनांक 10/11/2025 पर्यंत सातारा येथे झालेल्या 17 वर्षाखालील मुलांच्या शालेय राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेमध्ये कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी कुमार विराज विकास गोडसे याची महाराष्ट्राच्या बास्केटबॉल संघा मध्ये निवड झाली .
या विद्यार्थ्याच्या या यशाबद्दल त्याचे व त्यांच्या पालकांचे व त्यांच्या प्रशिक्षकांचे *शिवरत्न शिक्षण संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष मा. खासदार श्री. धैर्यशिल मोहिते-पाटील, अध्यक्षा तथा शिवरत्न पॅटर्नचे चेअरमन मा. सौ. शितलदेवी धैर्यशिल मोहिते-पाटील व सर्व संचालक मंडळ तसेच प्रशालेचे प्राचार्य ,समन्वयक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचेकडून अभिनंदन… होत आहे




















