वैराग – विश्व हिंदू परिषदचे कार्यकर्ते अमोल डोळसे यांची सोलापूर शिवस्मारक येथे झालेल्या विहिंपच्या बैठकीत विहिंप जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी निवड करण्यात आली.
सदरची निवड ही विहिंप केंद्रीय सहमंत्री तथा सत्संग प्रमुख दादा वेदक , प्रांत सहमंत्री विजयकुमार पिसे, पश्चिम महाराष्ट्र सहमंत्री नितीन वाटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड करण्यात आली.
डोळसे यांनी आतापर्यंत केलेल्या विहिंपच्या कार्याची दखल घेऊन ही निवड करण्यात आली आहे या बैठकीस विभाग मंत्री जयदेव सुरवसे, जिल्हा मंत्री संजय जमादार, जिल्हा सहामंत्री बापुराव कदम बजरंग दल सोलापूर शहर प्रमुख प्रमोद यलगंटी,वैराग प्रखंड मंत्री श्रीकांत काशिद या सह बजरंग दल ,धर्मप्रसार , दुर्गावाहिनी, मातृशक्ती चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


















