थंडीच्या काळात सर्दी-पडसं आणि घसा खवखवण्याची समस्या सहसा अनेकांना उद्भवते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील.
या काळात काय खावे आणि काय खाऊ नये? जाणून घ्या
▪️ तळलेले पदार्थ : घसा खवखवणे किंवा घसा दुखत असल्यास तळलेले पदार्थ अजिबात खाऊ नका.
▪️ दूध : या काळात दुधाचे सेवन तुमच्यासाठी हानीकारक ठरू शकते. दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ जास्त प्रमाणात घेऊ नका. यामुळे कफ वाढतो.
▪️ मिठाच्या पाण्याने गुळण्या करा : घशाचा त्रास दूर करण्यासाठी मिठाच्या पाण्याने गुळण्या करा. यामुळे घशात जमा झालेला कफ सहज निघून जातो. घसा साफ केल्याने संसर्ग दूर होण्यास मदत होईल.
▪️ ज्येष्ठमध : घसादुखी किंवा घसा खवखवल्यास ज्येष्ठमध खायला हवा. यामुळे घसादुखीची समस्या दूर होईल.
टीप : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी.