लोकप्रिय मराठी अभिनेते प्रशांत दामले यांच्या आईचं आज बुधवार ६ सप्टेंबर २०२३ रोजी दुःखद निधन झालं आहे. आईच्या निधनामुळे त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. प्रशांत दामले यांच्या आई विजया दामले यांचं आज बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास निधन झालं. त्या ९२ वर्षांच्या होत्या. त्यांचं राहत्या घरी निधन झालं. ही घटना घडली तेव्हा प्रशांत दामले हे नाटकाच्या प्रयोगांसाठी परदेशी होते. तेव्हा त्यांना आईच्या निधनाचं वृत्त समजलं. त्यानंतर ते तातडीने मुंबईच्या दिशेने रवाना झाले. विजया दामले यांच्या पार्थिवावर आंबोली स्मशानभूमीत दुपारी ४ वाजताच्या सुमारास अंत्यसंस्कार पार पडले. अशी माहिती जवळच्या व्यक्तींनी दिली. काही वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांचं देखील निधन झालं होतं
