गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सहकुटुंब शनिवारी (२३ सप्टेंबर) लालबाग राजाच्या दर्शनासाठी मुंबईत येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान केंद्रीय सुरक्षा यंत्रणा आणि मुंबई पोलीस विशेष सुरक्षा व्यवस्था ठेवणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शाह दुपारी २ वाजता मुंबई विमानतळावर पोहोचतील. त्यानंतर दुपारी ३ वाजता लालबाग राजाचे दर्शन घेतील. येथे साधारणतः २५ मिनिटे ते पूजा अर्चा करतील. पुढे मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ निवासस्थानी गणेश दर्शन घेतील. त्यानंतर वांद्रे येथे आशिष शेलार यांच्या सार्वजनिक गणपतीचे दर्शन घेतील. पुढे मुंबई विद्यापीठात लक्ष्मण राव इमानदार स्मृती व्याख्यान कार्यक्रमात सहभागी होतील. त्यानंतर सायंकाळी दिल्लीसाठी रवाना होणार आहेत.
या दौऱ्यात त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस त्याचबरोबर भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे हे सुद्धा उपस्थित होते.