रिपब्लिकन पक्षाचे (आठवले) राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर यांचा अमृत महोत्सवी सोहळा उद्या सोमवारी ११ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी २.०० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मंत्रालया समोर, मुंबई येथे पार पडणार आहे.
या अमृत सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले असतील तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपसभापती (विधानपरिषद) – निलम गोऱ्हे तसेच खासदार, गटनेते राहुल शेवाळे, खासदार गजानन किर्तीकर, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, जेष्ठ पत्रकार अरुण खोरे, जेष्ठ साहित्यिक अर्जुन डांगळे, रिपाई चे महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ सरवदे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.