आंध्रप्रदेशातील स्किल डेव्हलपमेंट घोटाळा प्रकरणी आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि त्यांचा मुलगा नारा लोकेश यांना आज, शनिवारी सकाळी अटक करण्यात आलीय.
चंद्रबाबू नायडू यांना आज, शनिवार सकाळी 6 वाजता नंदयाला मधून त्यांना अटक करण्यात आली. सीआयडीने त्यांच्या विरोधात अजामीनपत्र अटक वॉरंट जारी केले होते. आंध्र प्रदेश पोलिसांनी चंद्राबाबू यांचा मुलगा नारा लोकेश यांनाही ईस्ट गोदावरी जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे. आंध्र प्रदेश पोलिसांनी ते व्हॅनिटी व्हॅनमध्ये आराम करत असताना त्यांना अटक केली. तब्बल 250 कोटींच्या घोटाळा प्रकरणी त्यांच्या विरोधात 2021 मध्ये एफआयआर दाखल झाला होता. अटकेनंतर त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी नंदयाला रुग्णालयात नेल्यानंतर तिथून त्यांना कोर्टात हजर करण्यात आले.