लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा नुकतीच आप नेते राघव चड्डासोबत विवाहबंधनात अडकली आहे. बॉलिवूडमधील आणखी एक अभिनेत्री आता मिसेस झाली आहे. त्यांनी २४ सप्टेंबर रोजी उदयपूर येथे लग्नगाठ बांधली. चाहते त्यांच्या लग्नाच्या फोटो पाहण्यासाठी आतुर झाले होते. आता अखेर त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. या फोटोंनी चाहत्यांची मनं जिंकून घेतली आहेत. अभिनेत्रीचा लूक पाहून चाहते तिच्या प्रेमात पडले आहेत. त्यांनी लग्नासाठी पांढऱ्या आणि मोती रंगाची थीम ठेवली होती. तिचा लेहेंगाही मोती रंगाचा आहे.
मिस्टर आणि मिसेस
हे फोटो शेअर करत तिने लिहिलं, ‘नाश्त्याच्या टेबलावर पहिल्याच गप्पा झाल्यापासून आमची मनं आम्हाला कळत होती. खूप दिवसांपासून या दिवसाची वाट पाहत होतो.. म्हणून शेवटी मिस्टर आणि मिसेस होण्यात धन्यता मानली! पुढे तिने लिहिलं, ‘एकमेकांशिवाय जगूच शकत नव्हतो. आता आमची कायमची सुरुवात.’ त्यांच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. चाहत्यांना त्यांचे फोटो प्रचंड आवडले आहेत. तर अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने देखील आपल्या बहिणीला कमेंट करत माझ्या शुभेच्छा कायम तुमच्या सोबत आहेत असं लिहिलं आहे.