मुंबई नाशिक महामार्गावर मुंबईहून नाशिकच्या दिशेने जात असताना साई कुटीर जवळ ट्रिपल सीट मोटरसायकलस्वाराचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. या घटनेत मोटारसायकल बॅरिकेड तोडून पुढे चालणाऱ्या ट्रकवर पाठीमागून जाऊन जोरदार आढळली.
या अपघातात मोटर सायकल वरील समाधान देवराम भगत, सचिन कचरू पथवे रा. धार्णोली वैतरणा हे दोघे जण जागीच ठार झाले. भाऊ भगत रा. खंबाळे हे जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच रूट पेट्रोलिंग टीमच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी टोलच्या रुग्णवाहिकेद्वारे दाखल होत जखमींना पुढील उपचारासाठी इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. इगतपुरी पोलिसांकडून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.