जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाची बिंदू नामावली आता अंतिम झाली आहे. पण, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा महासंघ, अनुसूचित जाती मागासवर्गीय संघटनांसह इतर काही संघटनांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करून ती मागासवर्गीय कक्षाला पाठविली जाणार आहे. तुर्तास सोलापूर जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये ७०० शिक्षकांची भरती होईल, अशी स्थिती आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी अनुदानित शाळांमधील जवळपास ३० हजार शिक्षकांची रिक्तपदे भरली जाणार आहेत. त्यासाठी प्रत्येक जिल्हा परिषदेला बिंदू नामावली अंतिम करून त्यास मागासवर्गीय कक्षाची मंजुरी बंधनकारक आहे. त्यानंतर त्या त्या जिल्हा परिषदांनी पवित्र पोर्टलवर रिक्तपदे आणि भरायची पदे याची मागणी करणे अपेक्षित आहे.