सावलीत २ वाघांच्या शिकारी प्रकरणातील ३ आरोपींची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान दोन वाघांची शिकार केल्याची कबुली त्यांनी केली आहे.
सावली वन विभागाने वाघ शिकार प्रकरणी गुवाहाटी येथून आधीच वन कोठडीत असणाऱ्या रुमालसिंग बावरी, सोनू सिंग रणजीत सिंग बावरी, राजू सिंग गोपीसिंग बावरी या तिघांना ताब्यात घेतले होते. तिघांनाही न्यायालयात हजर केले असता ३० ऑगस्टपर्यंत वन कोठडी सुनावली होती.
सावली वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या राजुरी फाल येथे दोन वाघाची शिकार केल्याची कबुली या आरोपींनी दिली होती. या तिघांची ही वनकोठडी संपल्यानंतर त्यांना चंद्रपूर जिल्हा कारागृहात गुरुवारी रवानगी करण्यात आली. २ सप्टेंबरला त्यांना पुन्हा गुवाहाटी येथील कारागृहात नेण्यात येणार असल्याची माहिती सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण विरुटकर यांनी दिली.