Thursday, February 19, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

चला तर…मृत्यूनंतरही माणुसकी जिवंत ठेवूया… अवयवदान करूया !

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
September 2, 2023
in india
0
चला तर…मृत्यूनंतरही माणुसकी जिवंत ठेवूया… अवयवदान करूया !
0
SHARES
63
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भारतीय संस्कृतीत “दान” या शब्दाला खूप महत्त्व आहे. त्यापैकी रक्तदान, नेत्रदान याविषयी समाजात बऱ्यापैकी जनजागृती झाली आहे. शासनाच्या विविध राष्ट्रीय कार्यक्रमांपैकी “अवयवदान” हा सुध्दा राष्ट्रीय उपक्रम देशात राबविण्यात येतो. आजपावेतो वैज्ञानिकांनी आपापल्या क्षेत्रात भरपूर संशोधन करून नवनवीन शोध लावले आहेत आणि अजूनही काही शोध लावण्याच्या प्रयत्नात आहेत.

सन १९५४ साली पहिल्यांदा “अवयवदान” करण्यात आले. त्यावेळी रोनाल्ड ली हेरिकने किडनी दान करून स्वतःच्या भावाला नवजीवन दिले. त्याचवेळी डॉ.जोसेफ मरे यांनीही पहिल्यांदाच किडनी प्रत्यारोपण केले. या मानवतावादी कार्यासाठी डॉ. जोसेफ मरे यांना 1990 साली शरीरशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.

दरवर्षी १३ ऑगस्ट रोजी अवयवदानाविषयी जनजागृती करण्यासाठी, त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी, लोकांमधील भिती दूर होण्यासाठी “जागतिक अवयवदान दिवस” जगभरात विविध उपक्रमांनी साजरा केला जातो. तसेच हा दिवस लोकांना मृत्यूनंतर त्यांचे निरोगी अवयव गरजू व्यक्तीला दान करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करतो. मूत्रपिंड, हृदय, स्वादुपिंड, डोळे, फुफ्फुसे, त्वचा इत्यादी अवयव दान केल्याने दीर्घ आजारांनी ग्रस्त लोकांचे प्राण वाचविले जावू शकतात.

निरोगी अवयवांच्या अनुपलब्धतेमुळे अनेक लोक आपले प्राण गमावतात. अवयवानामुळे आपण त्यांचे प्राण वाचवू शकतो. व्यक्ती वयाच्या १८ वर्षांपासून ते ६४ वर्षापर्यंत अवयवदान करता येवू शकते.

पृथ्वीवर कोणतीही गोष्ट /वस्तू वाया जात नाही. एखाद्या रुग्णाबाबत एखाद्या अवयवावरील औषधोपचार संपल्यावर डॉक्टरांचा शेवटचा सल्ला असतो तो म्हणजे “ऑर्गन ट्रान्सप्लांट ” म्हणजेच अवयव प्रत्यारोपण. एखाद्याच्या शरीराचा निकामी झालेला अवयव उदा. किडनी, यकृत, डोळे, ह्रदय, त्वचा इ.शस्रक्रियेव्दारे प्रत्यारोपण करून त्याजागी दान केलेला संबंधित अवयवाचे वैद्यकीय सल्ल्यानुसार मानवी शरीरात प्रत्यारोपण केले जाते. मानवाचे प्राण वाचविण्यासाठी मानवी अवयवदान अत्यंत महत्त्वाचे ठरते.

अशा प्रकारे गरजू व्यक्तीची निकामी अवयवाची गरज पूर्ण होण्यासाठी जनजागृती करून जीवनदान दिले जाते. समाजात अवयवदानाविषयी मार्गदर्शन तसेच जनजागृती होणे आवश्यक आहे. आपल्या घरातील व्यक्तीला अपघात, शस्त्रक्रिया इ.वेळेस जेव्हा तातडीची गरज पडते तेव्हा खऱ्या अर्थाने याची जाणीव होते. प्रत्येकाला आपल्या रुग्णाचा जीव वाचवायचा असतो. यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करीत असतो. पण नाईलाज असतो ? कारण पैसा, औषध, इ. बाबी आपण धावपळ करून उपलब्ध करु शकतो. पण एखादा दुसऱ्या मनुष्याचा अवयव आणणे तसेच घरातील आपल्याच नातेवाईकांना अवयवदान करण्यासाठी प्रवृत्त करणे, हे मात्र कठीण काम आहे. कारण पैसा, औषध अशा गोष्टीसाठी मदत कुणीही करेल, पण अवयवाची मदत कुणीही करु शकणार नाही. याला कारण देखील तसेच आहे, समाजात याविषयी जनजागृती होणे, याविषयीचे गैरसमज दूर होणे, अत्यावश्यक आहे, ही काळाची गरज आहे. यासाठी शासन/स्वयंसेवी संस्था आदींच्या माध्यमातून मानवाच्या अवययदानाचे महत्त्व, याविषयीचे मार्गदर्शन ,फायदे, कार्यपद्धती आदि विषयांबाबत समुपदेशन व जनजागृती होणे आवश्यक आहे.

अवयवदानाचे महत्त्व :

शरीरातील कोणताही अवयव निरुपयोगी होणे, म्हणजे त्या संपूर्ण कुटुंबाचे शारीरिक, आर्थिक, मानसिक स्वास्थ्य नष्ट होणे. त्यामुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती देखील हलाखीची होऊन जाते. शरीरातील एखादा अवयव निरुपयोगी होण्यामुळे मूत्रपिंड, यकृत, हृदय, फुप्फसे अशा अनेक भागांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. वेगवेगळ्या आजारांमुळे आपल्या देशात दरवर्षी साधारणतः अनेक लोक बळी पडतात. यातील अनेकांचा मृत्यू हा शरीरातील एखादा महत्त्वाचा अवयव निकामी झाल्यामुळे होतो. मात्र अवयदानामुळे अनेकांचा जीव वाचविला जाऊ शकतो.

नातेवाईकांची संमती आवश्यक :

देशात दररोज अपघातात अनेक लोकांचा मृत्यू होत असतो. एखाद्याचा अपघात झाल्यानंतर संबंधितास दवाखान्यात उपचारासाठी दाखल केल्यानंतर कधीकधी त्या रुग्णास “ब्रेनडेड” घोषित केले जाते. अशा वेळेस डॉक्टर तसेच तज्ञांकडून त्या रुग्णाच्या घरातील व्यक्तीला, नातेवाईकांना समजावून, आपल्यामुळे दुसऱ्याला जीवनदान मिळण्यासाठी अवयवदानाबाबत समुपदेशन केल्यास आवश्यक अवयवदान करता येऊ शकते. ज्यामुळे गरजू रुग्णांना जीवनदान मिळू शकते . अशा वेळी त्यांच्या स्वैच्छिक अवयवदानाने इतर लोकांना जीवनदान मिळू शकते. शासन तसेच शासनमान्यता विभागामार्फत काढलेल्या अवयवांचे ६ ते ७२ तासात पुन:र्रोपण करण्यात येते.

एक अवयवदाता कमीत कमी आठ लोकांचे जीव वाचवू शकतो. जिवंत असताना यकृत, मूत्रपिंड, फुफ्फुस,स्वादुपिंड, ह्रदय,त्वचा आणि आतडे इ.अवयवांचे दान करता येते.

जे शरीर आपण आपल्या मरणानंतर नष्टच होणार आहे, मग अवयवदानाने एखाद्या व्यक्तीला जीवनदान मिळत असेल तर आपण स्वतःहून अवयवदानाची समाजात जनजागृती करण्यात गैर काय? ही जनजागृती सामान्य जनतेपर्यंत जोपर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत “अवयवदान” हे दानदेखील माणुसकीच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहे, हे समाजाला आपण पटवून दिले पाहिजे. प्रत्येक मानवाने सामाजिक बांधिलकी म्हणून अवयवदानासाठी पुढे येऊन आपल्या जवळच्या शासनमान्यताप्राप्त अवयवदान केंद्रात नोंदणी करणे आवश्यक आहे. मरणोत्तर निरोगी नेत्र, यकृत,किडनी, शरीराचे विभिन्न भाग इ.स्वयंस्फूर्तीने दान करु शकता.अवयवदान हे आजच्या युगात गरजू रुग्णांसाठी नक्कीच आशेचा किरण ठरणार आहे, यासाठी शासनस्तरावरून मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जात आहे. आपल्या शरीरातील अवयव वेळप्रसंगी गरजू रुग्णांना जीवनदान देऊ शकेल…… !

अवयवदानाचा उपदेश करणे, अवयवदान संमतीपत्र भरून देणे सोपे आहे. परंतु जेव्हा अवयवदान करण्याची प्रत्यक्ष वेळ येते तेव्हा मात्र अवयवदानाविषयी केलेला निश्चय गळून पडतो …ज्या कुटुंबातील व्यक्ती “ब्रेन डेड” असते किंवा ती व्यक्ती मरण पावते तेव्हा साहजिकच सर्व कुटुंबिय दुःखात बुडालेले असतात,अशा दु:खद प्रसंगी त्या कुटुंबियांचे समुपदेशन करणे, हे अत्यंत अवघड काम डॉक्टर आणि समुपदेशक यांना करावे लागते.

समुपदेशन करणारे जे सेवाभावी कार्यकर्ते असतात त्यांना शासनातर्फे प्रशिक्षण देण्याची गरज आहे. अवयवदान संमतीपत्र भरणारे अवयवदान करतीलच, याची खात्री नसते. वचनपत्र भरून देणे,ही अवयवदानातील पहिली पायरी आहे. ज्यामुळे अवयवदानाचा सकारात्मक विचार त्या व्यक्तीच्या मनात येतो. कमीत कमी पहिल्या टप्प्यात तालुकास्तरावर प्रशिक्षित समुपदेशक तयार झाले तर अवयवदान प्रक्रिया सोपी होण्यास खूप मदत होईल.

अवयवदान या विषयावर जनजागृती होण्यासाठी अनेक मान्यवर मनापासून प्रयत्नशील आहेत. याविषयी आणखी सविस्तर माहितीसाठी आपण त्यांच्याशीही (माधव अटकोरे, नांदेड- 80875 65172, कुमार कदम- 9869612526) संपर्क करू शकता.

चला तर मग माणुसकीप्रति आपले कर्तव्य निभाविण्यासाठी आपणही “अवयवदान संमतीपत्र” भरून या चळवळीत सक्रिय सहभागी होवूया… मृत्यूनंतरही अवयवदानातून माणुसकी जिवंत ठेवूया…!

Post Views: 115
Previous Post

सोसायटी ऑफ पेडियाट्रिक युरोलॉजी चॅप्टरच्या 11वी वार्षिक राष्ट्रीय परिषदेत नितीन गडकरी

Next Post

LIVE :- सतीश धवन स्पेस सेंटर – श्रीहरिकोटा येथून PSLV-C57/आदित्य-L1 मिशनचे प्रक्षेपण….

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
LIVE :- सतीश धवन स्पेस सेंटर – श्रीहरिकोटा येथून PSLV-C57/आदित्य-L1 मिशनचे प्रक्षेपण….

LIVE :- सतीश धवन स्पेस सेंटर - श्रीहरिकोटा येथून PSLV-C57/आदित्य-L1 मिशनचे प्रक्षेपण....

ताज्या बातम्या

उद्यापासून दहावीची परीक्षा सुरू जिल्ह्यात 64, हजार 454 विद्यार्थी देणार परीक्षा.#public #10thmaths

February 19, 2026

झुलवा पाळणा बाळ शिवाजीचा सोलापुरात शिवजन्मोत्सव साजरा नागरिकांची प्रचंड गर्दी. #public #marathinews

February 19, 2026

त्या मुलीचा व्हिडिओ जबरदस्तीच – पडळकर #viral #marathinews #aajsolapur #maharashtranews

February 19, 2026

वरिष्ठ महाविद्यालय व विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांची नियमित अनुपस्थिती: एक गंभीर समस्या व आव्हान – प्राचार्य डॉ. शिवराया आडवीतोट

February 19, 2026

संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांच्या जयंतीचा उत्साह

February 19, 2026

शिवरायांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करावा

February 19, 2026

आमदार उत्तमराव जानकर यांच्या गरुड बंगल्यास कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांची सदिच्छा भेट

February 19, 2026

मुंबई येथे प्रदेश पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष यांची संयुक्त बैठक संपन्न

February 19, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0687026

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697