मोडनिंब (ता.माढा) येथे सार्थक गणेश माने याच्या सहाव्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्रीकृष्ण गोशाळा मोडनिंब येथे एक दिवसाचा चारा वाटप करण्यात आले.जय भवानी चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक यांच्या संयुक्त सौजन्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
श्रीकृष्ण गोशाळेत गेल्या काही महिन्यात कत्तलखान्यातून वाचविण्यात आलेल्या जवळपास शेकडो गोवंश पाठविण्यात आले.सध्या दोनशेच्या वर जनावरे या गोशाळेत आहेत. जनावरांचा भार वाढल्याने त्यांचा पोषणाचा प्रश्न गोशाळेच्या संचालकापुढे पडला आहे. शासनाने आर्थिकदृष्ट्या सक्षम गोशाळा करण्यावर त्यांचा भर द्यायला हवा असे प्रथमेश पवार यांनी सांगितले.गोशाळेमध्ये मोठ्या प्रमाणात जनावरे आहेत. त्यांच्यावर होणारा खर्च गोशाळांना परवडण्यासारखा राहिलेला नाही.त्यामुळे गोशाळा चालकांनी शासनाकडे गोवंशाच्या पोषणासाठी अनुदान द्यावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे. चिमुकल्याच्या वाढदिवसानिमित्त तरुणांनी पुढाकार घेऊन केलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याप्रसंगी संचालक यशवंत सुर्वे, शुभम पाटणे, बंटी पवार, राज पाटील, अजिंक्य निकम,वैभव पाटील, आप्पा पाटील, ओंकार सुर्वे, ऋषी पाटील, गणेश महामुनी, शुभम काळे,राहुल गडेकर, यश पाटणे, अथर्व पवार, विक्रांत वाघमारे, शुभम वाघमारे, प्रतीक तोडकरी, प्रणय सुर्वे, वैभव शिंदे, प्रेम गांधी, अमोल जाधव, संकेत सुर्वे, अमेय पवार, ओम पाटणे, प्रतीक पाटील आदी उपस्थित होते.