भोकर तालुक्यातील महाराष्ट्र – तेलंगणा सीमेलगत असेलल्या किनी या गावच्या परिसरात बंद असलेल्या लक्ष्मी नृसिंम्हा राईस मिल मध्ये जुगार अड्डा सुरु झाला असल्याची गोपनीय माहिती भोकर पोलीसांना मिळाल्यवरुन भोकर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विकास पाटील व पोलीस उपनिरीक्षक अनिल कांबळे पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पाटील यांनी सहाय्यक पो.उप.नि.प्रल्हाद बाचेवाड,पो.कॉ.ज्ञानेश्वर सरोदे,चंद्रकांत आर्किलवाड, सय्यद मोईन, विकास राठोड,प्रकाश वावळे व महिला पोलीस नायक सिमा वच्छेवार आदी पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन दिनांक २७ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी किनी गावच्या बंद राईस मिल मध्ये सुरु असलेल्या जुगार अड्डयावर सापळा रचून धाड टाकली. घटनास्थळी तेलंगणा राज्य व महाराष्ट्रातील काही प्रतिष्ठीत व बंद राईस मिलचे मालक पत्त्यांचा जुगार खेळवितांना घटनास्थळी मिळून आले.यावेळी पोलीस निरीक्षक विकास पाटील यांनी या जुगार अड्ड्यावर करवाई करून जुगाऱ्यांकडून रोख १ लाख ६०० रुपये,१६ किमती मोबाईल, ७ दुचाकी व १ चारचाकी वाहन आणि जुगार खेळण्याचे साहित्य असा एकूण १५ लाख ८२ हजार ७७० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.

यावेळी जुगार अड्डा चालक मालक नाव संजीव रेड्डी रा.किनी ता.भोकर असे असल्याची माहिती मिळाली असून ताब्यात घेण्यात आलेल्या अन्य १६ जुगाऱ्यांमध्ये संतोष खलशे रा. दहेगाव, गणेश कदम रा. निघवा, श्रीनिवास जाधव रा.रंजणी,राजकुमार बालिजापल्ली, आनंद राठोड रा. डोडरणा ” तांडा,देवाला अंकाम रा.भोशी, मल्लेश नारडे रा. कुबेर, बालाजी घोसालवाड रा. बोळासा,विठ्ठल गोपवाड रा.गोडसरा, देविदास येनकुसाब रा.निघवा,गजराज पळसे रा. पळशी, सत्यनारायण शिंदे रा.दहेगाव, सुरेश ठाकूर रा.पळशी, वरील सार्वजण ता.मुधोळ जि.निर्मल,तेलंगणा राज्य येथील आहेत.तर श्रीनिवास कदम रा.लगळूद, गोविंद जाधव रा.महागाव,दिलीप जाधव रा. लगळूद, हे तिघेजण ता.भोकर जि.नांदेड येथील आहेत.

पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पाटील यांच्या फिर्यादीवरून जुगार अड्डा चालविणाऱ्या बंद राईस मिलच्या मालकासह वरील १७ जुगाऱ्यांविरुद्ध जुगार कायदा प्रमाणे भोकर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर पो.नि.विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील अधिक तपास पो.हे.कॉ.भीमराव जाधव हे करणार आहेत.घटाना स्थळापासुन काही जुगाऱ्यांना पळ काढण्यात यश आले असुन तालुक्यातील ह्या जुगार अड्डावर भोकर पोलिसांनी केलेल्या या धाडसी कारवाईमुळे तालुक्यासह परिसरातील जुगार अड्डा चालकात एकच खळबळ उडाली आहे.



















