शहराजवळ असलेल्या मानपाडा गावात एका दारूड्याने राहत्या घरातच स्वतःच्या १० वर्षाच्या गतिमंद मुलीची गळा दाबून हत्या केली. या प्रकारानंतर मारेकरी दारूडा पत्नी काम करत असलेल्या ठिकाणी गेला. तेथे घरात मुलगी मयत झाल्याची माहिती देऊन तेथून तो फरार झाला. मुलीची आई लिलावती अग्रहरी हिच्या तक्रारीवरून पती मनोज अग्रहरी (३५) याच्या विरुध्द मानपाडा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
अग्रहरी कुटुंब गोरगरीब आहे. तक्रारदार लिलावती यांना तीन मुली आहेत. त्यातून एक मुलगी मात्र मतिमंद आहे. दोन मुली मजुरीची कामे करतात. या मुलींचे वडील मनोज हा दारूडा आहे. डोंबिवलीत एका किरणा दुकानात तो कामगार म्हणून काम करत असतो. गावठी दारू पिवून आल्यावर मनोज नेहमी पत्नी आणि दोन मुलींसह बिचाऱ्या गतिमान गतिमंद मुलीला मारहाण करत होता.
या गतीमंद मुलीचा काही उपयोग नाही. तिला मरावेच लागेल अशी भाषा तो करत असायचा. याबद्दल पत्नीने तक्रार दाखल केली आहे. इतर दोन मुलींसह पत्नीचाही गळा दाबून तो तिला मारण्याचा प्रयत्न करायचा. गतिमंद मुलीच्या संगोपनाकडे आईचे पूर्ण लक्ष असायचे. दुपारच्या वेळेत मुलीकडे लक्ष देणे आवश्यक असल्याने ती कामावरुन काही वेळासाठी घरी यायची आणि पुन्हा कामावर जात असे.
काल संध्याकाळी मनोज नेहमीप्रमाणे भरपूर दारू पिवून घरी आला. त्याने दारुच्या नशेत गतिमंद मुलीची गळा दाबून हत्या केली. तर, मनोज हा पत्नी काम करत असलेल्या एमआयडीसीतील कामाच्या ठिकाणी गेला. तेथील कर्मचाऱ्यांना पत्नी लिलावती हिला तातडीने घरी जाण्यास सांगा. गतिमंद मुलगी मयत झाली आहे, असा निरोप दिला. तेथून मनोजने पळ काढला. कर्मचाऱ्यांनी मुलीची आई लिलावतीला तिच्या पतीने केलेल्या प्रकार सांगितला. हे ऐकून लिलावतीने तातडीने घरी घठले. तेव्हा मुलगी बिछान्यावर निपचित पडली होती. पती मनोजने यानेच आपल्या गतिमंद मुलीची गळा दाबून हत्या केल्याचा संशय व्यक्त करुन केला. लिलावतीने पती मनोज अग्रहरी विरुध्द पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.