भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त अनेकांनी ट्विटर अकाऊंटवर तिरंगा झेंड्याचा डीपी ठेवला आहे. यामुळे ट्विटर नाराज झाले असून तिरंग्याच्या डीपी ठेवणाऱ्या अनेकांच्या अकाऊंटवरून ब्लू-टिक हटवले आहे. यामध्ये गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उत्तराखंडचे पुष्कर सिंह धामी आणि इतर नेत्यांचा समावेश आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत प्रत्येकाने सोशल मीडियावर तिरंग्याचा डीपी ठेवण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटला तिरंग्याचा डीपी ठेऊन गोवेकरांना सोशल मिडियावर डीपी बदलण्याचे आवाहन केले होते. मात्र ज्या भाजप नेत्यांनी तिरंग्याचा डीपी ठेवला आहे, त्यांचे ट्विटर गोल्डन/ ब्लू टिक काढण्यात आले आहे.यामध्ये काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांचे ब्लू टिक हटवण्यात आले आहे.भाजपतर्फे देशभरात ‘हर घर तिरंगा’ योजनेंतर्गत आपल्या सोशल मिडियावर तिरंगा डीपी लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व भाजप नेत्यांनी स्वत:च्या सोशल मिडियावर तिरंगा लावला होता.