भविष्यकार बाबा वेंगा यांनी वर्तवलेल्या भविष्यवाणीनुसार, 2023 हे वर्ष अंधकारमय असेल. या वर्षात एलियन्स आणि आण्विक स्फोटांच्या संभाव्य भेटी आहेत. बल्गेरियातील बाबा वेंगा यांनी केलेल्या भविष्यवाणी दरवर्षी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ‘बाल्कनच्या नॉस्ट्राडेमस’ अशी त्यांची ओळख आहे. वयाच्या 12 व्या वर्षी बाबा वेंगा यांची दृष्टी गेली.
बाबा वेंगा यांनी तिसऱ्या महायुद्धाची भविष्यवाणी केली आहे. त्यात जैविक शस्त्रांच्या वापराविषयी सांगितलं आहे. बाबा वेंगा यांच्या मते, 2023 मध्ये सौरवादळ येऊ शकतं. सौरवादळामुळे पृथ्वीची हालचाल बदलू शकते. त्यामुळे लोकांच्या जीवनात भयंकर धोका निर्माण होईल. बाबा वेंगा यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1911 रोजी झाला. त्यांचं खरं नाव ‘वांगेलिया पांडेवा गुश्तारोवा’ होतं. जे बाबा वंगा म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांनी 9/11 चा दहशतवादी हल्ला, ब्रेक्झिट यासह अनेक भाकीत केली होती, जी खरी ठरली.
बाबा वेंगा यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1911 रोजी झाला. त्यांचं खरं नाव ‘वांगेलिया पांडेवा गुश्तारोवा’ होतं. जे बाबा वंगा म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांनी 9/11 चा दहशतवादी हल्ला, ब्रेक्झिट यासह अनेक भाकीत केली होती, जी खरी ठरली. बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनुसार, आता लॅबमध्ये मुलं जन्माला येणार आहेत. एवढंच नाहीतर या मुलांच्या त्वचेचा रंग आणि त्यांचं लिंगही त्यांच्या पालकांना ठरवता येणार आहेत. बाबा वेंगा यांच्या म्हणण्यानुसार, इतर ग्रहांवरून येणाऱ्या शक्तींद्वारे पृथ्वीवर हल्ला होऊ शकतो. ज्यात लाखो लोक मारले जातील. यासोबतच आशिया खंडातील कोणत्याही अणुऊर्जा प्रकल्पात स्फोट होऊ शकतो. ज्याचा भारतावरही परिणाम होईल.
बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती असतील. एवढंच नाहीतर यंदाच्या वर्षात रशिया संपूर्ण जगावर राज्य करेल.
टीप : बल्गेरियातील बाबा वेंगा यांची भविष्यवाणी दरवर्षी सोशल मीडियावर व्हायरल होते. त्यांच्या या भविष्यवाणीचं दै. तरुण भारत सोलापूर समर्थन करीत नाही.