येथील दयानंद वाणिज्य महाविद्यालयाची बी. व्होकेशनल प्रथम वर्षाची विद्यार्थिनी काजल भाकरे हिने न्युझीलंड येथे झालेल्या पॉवर लिंफ्टग कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले आहे. शिवाय, गोल्डन गर्ल म्हणूनही नावलौकिक प्राप्त केला आहे. ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा नुकतीच न्युझीलंड येथे पार पडली. यात काजल भाकरे हिने मोठे यश मिळवून दयानंद वाणिज्य महाविद्यालयाचे नाव सातासमुद्रापार नेले आहे. 47 किलो वजन गटात तिने हे सुवर्णपदक प्राप्त केले आहे. काजलला क्रीडा विभाग प्रमुख डॉ.नितेश स्वामी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या उत्तुंग यशाबद्दल दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, सचिव रमेश बियाणी, संयुक्त सचिव सुरेश जैन, प्रभारी प्राचार्य डॉ. राजाराम पवार, क्रीडा विभाग प्रमुख डॉ. नितेश स्वामी, आयक्युएसी समन्वयक डॉ.बालाजी कांबळे, बी.व्होक. अभ्यासक्रम समन्वयक डॉ.विशाल वर्मा आदींनी अभिनंदन केले आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...