सभा, मोर्चा, आंदोलने, सण-उत्सव, मंत्र्यांचे (व्हीआयपी) दौरे याठिकाणी पोलिसांना बंदोबस्ताची ड्यूटी असते. वर्षात सरासरी २०० दिवस पोलिसांना बंदोबस्ताची ड्यूटी करावी लागत आहे. त्यानंतर आपल्याकडील गुन्ह्यांचा तपास वेळेत लावणे, पुन्हा रात्रगस्ती अशा कारणांमुळे पोलिसांना कुटुंबासाठी पुरेसा वेळ देता येत नसल्याची स्थिती आहे. बंदोबस्त, गुन्ह्यांचा तपास आणि कौटुंबिक जबाबदारी, याचा मेळ बसत नसल्याने अनेकजण तणावाखाली असल्याचे बोलले जात आहे.राज्यातील सत्तासंघर्षामुळे नेत्यांच्या कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यात सभा होत आहेत. त्यातच पुन्हा विविध विषयावरून आंदोलने, मोर्चे सुरुच आहेत. त्यामुळे पोलिसांना तपासकाम बाजूला ठेवून वारंवार बंदोबस्ताची ड्यूटी करावी लागत आहे.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

























