निवडणूक आयोगाने विधानसभेच्या 7 जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर केली आहे. ज्या राज्यांमध्ये पोटनिवडणूक होणार आहे त्यात झारखंड, त्रिपुरा, केरळ, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड यांचा समावेश आहे. या 6 राज्यांच्या 7 विधानसभांच्या पोटनिवडणुका आगामी 5 सप्टेंबर रोजी होणार आहेत.
यासंदर्भातील माहितीनुसार, झारखंडमधील डुमरी विधानसभा जागा जगरनाथ महतो (जेएमएम) यांच्या निधनानंतर रिक्त झाली आहे. त्याचप्रमाणे केरळच्या पुथुपल्ली विधानसभा जागेवर ओमन चंडी (काँग्रेस), त्रिपुराच्या बॉक्सानगर मतदारसंघातून समशुल हक (सीपीआयएम), पश्चिम बंगालच्या धुपगुरी विधानसभेच्या जागेवर बिष्णू पांडे (भाजप) आणि उत्तराखंडच्या बागेश्वर (एससी) जागेवर चंदनराम दास (भाजप) यांच्या निधनामुळे या जागा रिक्त झाल्या आहेत. तर त्रिपुरातील धानपूर विधानसभेची जागा भाजप नेत्या प्रतिमा भीमिक यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झाली आहे. त्याचप्रमाणे, उत्तर प्रदेशातील घोसी विधानसभा जागा दारा सिंह चौहान यांनी सपामधून राजीनामा दिल्यानंतर रिक्त झाले आहे.