कल्याण रोड राष्ट्रीय महामार्गावर मैलमिश्रित पाणी वाहात असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचा आरोप भाजपचे शहर सचिव दत्ता गाडळकर यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा महापालिका प्रशासनाला दिला आहे.
कल्याण रोड राष्ट्रीय महामार्गावर ठाणगे पेट्रोल पंपासमोर गेल्या एक महिन्यापासून मैल मिश्रित पाणी अक्षरश: रस्त्यावरून वाहत आहे.त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली असून साथीचे आजार उद्भवत आहेत.नागरि कांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.या ठिकाणाहून नागरिक प्रवास करीत असताना अंगावर व तोंडावर मैल मिश्रित पाणी उडत आहे.दररोज या मार्गावरून हजारो नागरिक,शाळकरी विद्यार्थी प्रवास करीत आहे.तसेच या कल्याण रोड परिसरामध्ये नागरिक वसाहती मोठ्या प्रमाणात आहे. मात्र महापालिका प्रशासनाचे या गोष्टीकडे दुर्लक्ष होत आहे.नागरिकांच्या आरोग्याशी मनपा प्रशासन खेळत आहे.एक महिना उलटला तरीही मनपा प्रशास नाने या गंभीर समस्येकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही.मनपाच्या वतीने मूलभूत प्रश्न जर मार्गी लागत नसेल तर नागरिकांनी विकास कामाच्या अपेक्षा कोणाकडे ठेवायच्या हा प्रश्न निर्माण होत आहे.जर मनपा प्रशासनाने लवक रात लवकर हा प्रश्न मार्गी लावला नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल,असा इशारा भाजपचे शहर सचिव दत्ता गाडळकर यांनी दिला.