Thursday, February 19, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

नागपूर : ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
September 23, 2023
in maharashtra
0
नागपूर : ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत
0
SHARES
78
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नागपुरात शुक्रवारी मध्यरात्रीनंतर विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेय. शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरल्यामुळे एनडीआरएफची मदत घ्यावी लागली आहे. शहरात अवघ्या 4 तासात 106 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली असून शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आलीय.

मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेकांच्या घरात पावसाचे पाणी शिरलेय. सीताबर्डी परिसरातील मोर भवन भागात पाणीच पाणी जमा झाले. बस स्थानकावरील बस पाण्यात बुडले. त्यासोबतच शहरातील अनेक सखोल भागात पावसाचे पाणी शिरले असून नागलवाडी, अंबाझरी कार्पोरेशन कॉलोनी मधील अनेक घरात पाणी शिरले आहे. हवामान विभागाने नागपुरात आधीच ऑरेंज अलर्ट दिला होता. त्यानुसार शुक्रवारी विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज होता. विदर्भात शुक्रवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. परंतु, रात्री पावसाची तीव्रता अधिकच वाढल्याने अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला. नागपूरमध्ये गेल्या 24 तासांत विक्रमी पावसाची नोंद झाली असून अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. अनेक वाहने आणि घरातील सामना पाण्यामुळे पूर्णपणे बुडाले होते. विक्रमी पाऊस पाहता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला आवश्यक उपाययोजना करण्याची सूचना दिली होती. त्यानुसार एनडीआरएफची एक आणि एसडीआरएफच्या दोन तुकड्या बचाव आणि मदत कार्यासाठी तैनात करण्यात आल्या आहेत. त्यासोबतच नागपूरमधील शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. तसेच मनपातर्फे नागरिकांना विनाकारण घराच्या बाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सततच्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी तसेच रस्त्यांवर पाणी जमा झाले आहे. नदी नाल्यांमध्ये पाणी वाढत असल्यामुळे पूल ओलांडू नये. पाणी कमी झाल्यानंतरच पूल ओलांडावा, असेही आवाहन प्रशासनाने केले आहे.

यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नागपुरात काल रात्री मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने काही भागात पाणी शिरले आहे. अवघ्या 4 तासात 100 मिमीपेक्षा अधिक पाऊस झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले. तसेच जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त हे घटनास्थळी पोहोचले असून तातडीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. सखल भागात अडकलेल्या नागरिकांना आधी तातडीने मदत करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. एनडीआरएफची एक आणि एसडीआरएफच्या 2 चमू बचाव कार्यात तैनात करण्यात आल्या आहेत. सातत्याने प्रशासनाशी संपर्कात असून परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

Post Views: 105
Previous Post

चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

Next Post

कुक्कुट पालनास प्रोत्साहन देणा-या योजना

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
कुक्कुट पालनास प्रोत्साहन देणा-या योजना

कुक्कुट पालनास प्रोत्साहन देणा-या योजना

ताज्या बातम्या

धाराशिव जिल्ह्यातील मोठी कारवाई १२ लाख ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त #public #marathinews #solapurnews

February 18, 2026

बदनापूर तालुक्यात संजय गांधी योजनेत मोठा गैरप्रकार.?? #public #marathinews #viral

February 18, 2026

विकास कामात कसलीही तडजोड नाही निकृष्ट काम करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल : आ.बबनराव लोणीकर

February 18, 2026

श्रीशैल पदयात्रेकरूंना औषधे व प्रथमोपचार पेटी.

February 18, 2026

संत सेवालाल महाराजांचे विचार आजही समाजासाठी दीपस्तंभ : आमदार बबनराव लोणीकर.#public #marathinews

February 18, 2026

प्रभात इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न..

February 18, 2026

न्यू हायस्कूल परिसरातील रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची रहिवाशांची मागणी..#public #solapurnews

February 18, 2026

इच्छुक उमेदवार म्हणाले पक्ष जे म्हणेल ते खर… #public #marathinews #viral

February 18, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0686278

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697