Friday, February 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

नाशिकच्या निर्यातीचा टक्का वाढविण्याचा आयमाचा निर्धार

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 27, 2023
in maharashtra
0
नाशिकच्या निर्यातीचा टक्का वाढविण्याचा आयमाचा निर्धार
0
SHARES
19
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पोषक वातावरणाचा लाभ उचलून नाशकातून निर्यातीचा टक्का वाढविण्यावर भर देण्याचा निर्धार अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) तर्फे जिल्हाधिकारी जलज शर्मा तसेच विविध औद्योगिक संघटना आणि बँकर्सतर्फे आयात- निर्यात धोरणावर आयोजित चर्चासत्रात व्यक्त करण्यात आला.

केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारतर्फे आयात-निर्यात संदर्भात नवीन धोरण बनविण्याचे काम सुरू असून विविध क्षेत्रातील उद्योजकांना याबाबत काय अडीअडचणी येतात त्यावर या चर्चासत्रात उहापोह झाला. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आपल्या भाषणात सुरुवातीला औद्योगिक क्षेत्र परिसरात शांतता प्रस्थापित करण्यास तसेच निर्यात वाढीसाठी आयमा आणि निमा या दोन्ही संस्था हातात हात घालून काम करीत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.महाराष्ट्रात निर्यातीला प्रोत्साहन देण्याचे शासनाचे धोरण आहे. नाशकातून निर्यातीचा वेग चांगला आहे. निर्यातीच्या बाबतीत नाशिक राज्यात टॉप 5 मध्ये आहे. नाशिक लवकरच टॉप 3 मध्ये कसे येईल या दृष्टीने पावले उचलण्याची गरज आहे,असेही ते पुढे म्हणाले.

महाराष्ट्र सरकारचे आयात-निर्यात विषयक धोरण ऑक्टोबरमध्ये जाहीर होणार आहे.त्याचा मसुदा तयार करतांना उद्योजकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचा तसेच सूचनांचा त्यात अंतर्भाव करण्यात येईल.त्याच अनुषंगाने आयमाने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक करून जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संदीप पाटील यांनी निर्यात करताना येणाऱ्या अडीअडचणी आणि निर्यातीबाबतची नाशिकची स्थिती याची तपशीलवार माहिती दिली. 2022-23 या वर्षात 23 हजार कोटींची निर्यात करून नाशिकने या क्षेत्रात उंच भरारी घेतली आहे.भविष्यात त्यात आणखी 15.5 टक्के वाढ अपेक्षित असून त्यादृष्टीने सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज त्यांनी प्रतिपादन केली.उद्योजकांना दिल्या जाणाऱ्या विविध सवलती आणि निर्यात वाढीसाठी जिल्हा उद्योग केंद्रातर्फे सुरू असलेल्या योजनांची माहितीही त्यांनी विशद केली.

प्रारंभी आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ यांनी आयमांची भूमिका स्पष्ट केली.नाशिक जिल्ह्यातील उद्योजकांना निर्यात वाढीसाठी मोठ्या संधी आहेत. आयमाने मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित निर्यात व्यवस्थापक घडवून त्यादृष्टीने पावले उचलली आहेत. निर्यात वाढीसाठी शासनातर्फे नवीन धोरणासाठी मसुदा तयार करण्यात येत असून त्यात आयमाची मोलाची भूमिका राहणार आहे.त्यासाठीच्या अडीअडचणींचे निरसन करण्यास आयमातर्फे इम्पेक्स पॉलीक्लिनिक सुरु करण्यात आले आहे. जिल्ह्याची निर्यात दुप्पट करण्याचा मानस असून यासाठी उद्योजकांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे पांचाळ यांनी सांगितले. उद्योजकांनी त्यांच्या सूचना व मागण्या लेखी स्वरूपात आयमाकडे पाठवाव्यात.त्याचा समावेश राज्याच्या निर्यात विषयक धोरणाच्या मसुद्यात करण्यास आपण शासनाला भाग पाडू,असेही पांचाळ यांनी नमूद केले

बँक ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक राजीव सौरव तसेच बँक ऑफ महाराष्ट्रचे क्षेत्रीय व्यवस्थापक सी.बी. सिंग यांनी त्यांच्या बँकांतर्फे निर्यातीबाबत उद्योजकांना दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती देतानाच आवश्यक ते सर्व सहकार्य सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

आयामाचे रवींद्र महादेवकर यांनी उद्योजकांच्या मागण्यां व अडीअडचणींविषयी माहिती दिली.जीएसटी उपायुक्त जगदीश डोड्डी यांनी जीएसटीबाबतच्या अडीअडचणींवर उद्योजकांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. निर्यातवाढीसाठी जिल्ह्यात पोषक वातावरण आहे.कृषी क्षेत्रात नाशिक जिल्हा देशात अव्वल दहा मध्ये कसा येईल यादृष्टीने पावले उचलणे गरजेचे आहे.आवश्यकता वाटल्यास त्यासाठी कृषी सल्लागारांचाही सल्ला घ्यावा असे निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी सुचविले.पोस्ट खात्याचे उपाधिक्षक प्रफुल्ल वाणी यांनी पोस्ट खात्याने सुरू केलेल्या डाक निर्यात केंद्राची माहिती दिली. चेंबरचे कांतीलाल चोपडा यांनीही मनोगत व्यक्त केले.

इपेक्स पॉलिक्लिनिक”चा शुभारंभ

आयात निर्यातीबाबतच्या अडीअडचणी आणि समस्या सोडवण्यास आयमाच्या पुढाकाराने सुरू झालेल्या ”इपेक्स पॉलिक्लिनिक”चा शुभारंभ जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते झाला.यामुळे निर्यातवाढीला मोठ्याप्रमाणात चालना मिळणार आहे.

Post Views: 89
Previous Post

नाशिक : मित्राची बाजू घेतो म्हणून युवकाची हत्या

Next Post

डोंबिवली : शिवमंदिर स्मशानभूमीची अवस्था दयनीय

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
डोंबिवली : शिवमंदिर स्मशानभूमीची अवस्था दयनीय

डोंबिवली : शिवमंदिर स्मशानभूमीची अवस्था दयनीय

ताज्या बातम्या

पुण्यातील रिक्षा चालकासह सोलापुरातील विधी संघर्ष बालकाला अटक केली आहे.. #crime #viral #aajsolapur

February 13, 2026

तुकाराम मुंढेनी केले ९०० दिव्यांग संस्था नोंदणी रद्द.. #viral #public #handicapped

February 13, 2026

शासकीय रुग्णालयातील उपचार निशुल्कच..#public #solapurnews #marathinews #viral

February 13, 2026

सोलापूर पुणे महामार्गावर अपघात कारचालक जागीच ठार..#public #viral #acsident

February 13, 2026

पुण्यातील रिक्षा चालकासह सोलापुरातील विधी संघर्ष बालकाला अटक केली आहे.#public #solapurnews #crime

February 13, 2026

भारत खरेदी करणार 114 राफेल विमान.#india #france #public #viral

February 13, 2026

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त १३ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन.#public

February 13, 2026

सोलापूर महानगरपालिका बनणार चकाचक डिजिटल.#public #marathinews #viral

February 13, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0678092

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697