महारेराने केलेल्या कारवाईमध्ये नाशिकमधील 53 तर जळगावमधील तीन आणि धुळ्यातील एक बिल्डरांचा समावेश असून त्यांची खाती महारेरा यांच्या वतीने गोठविण्यात आली आहे. यामुळे नाशिक जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.
ग्राहकांना बांधकाम प्रकल्पाची माहिती अपडेट करून न दिल्याबद्दल राज्यातील बिल्डरांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये नाशिकमधील 53 बिल्डरांचा समावेश असून त्यांना दिलेल्या नोटिसी नंतरही त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. जानेवारी महारेराकडे नोंदवले गेलेल्या तसेच प्रकल्पांना 20 एप्रिलपर्यंत स्थावर संपदा अधिनियमानुसार प्रकल्पाची माहिती देणे आणि सदनिकांची नोंद करणे याची माहिती आवश्यक होती. परंतु ती माहिती दिली गेली नाही.
त्यामुळे कारवाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातील जळगावमधील धुळेमधील एक बिल्डरच्या समावेश असल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आले.