मेरी मिट्टी मेरा देश अर्थात माझी माती माझा देश या शासनाने दिनांक ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान राबविल्या जाणाऱ्या उपक्रमाचा शुभारंभ हुतात्मा स्मारक येथे आज सकाळी क्रांती दिनाच्या निमित्ताने करण्यात आला.
हुतात्मा स्मारकांचे पदाधिकारी यांनी मातीचा कलश नाशिक महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी देशा प्रती प्रेम आदर भावना ही कायमस्वरूपी रहावी या उद्देशाने आज पासून मेरी मिट्टी मेरा देश या उपक्रमात कलशामध्ये सर्वांनी माती संकलित करून ही माती केंद्र शासनापर्यंत पोहोचविण्याची मोहीम सुरू झाली आहे. आज सकाळी हुतात्मा स्मारकाचे अध्यक्ष विजय राऊत आणि देश सेवा करीत असताना बलिदान झालेले स्वातंत्र्यसैनिक,वीर जवान यांच्या कुटुंबातील सदस्यांनी ध्वजारोहण करून वीर जवानांना मानवंदना दिली. तसेच मिट्टी कलश जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी हुतात्मा स्मारकाचे सर्व पदाधिकारी आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या परिवारातील सदस्य नागरिक उपस्थित होते.