पटवर्धनकुरोली ता.पंढरपूर येथील युवक देविदास दिगंबर नाईकनवरे याचा ४ चाकी गाडीने चिरडून खून केल्याची घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास घडली. रात्री उशिरा करकंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.ही घटना पटवर्धनकुरोली आव्हे रस्त्यावर घडली असून,याप्रकरणी आरोपी ब्रह्मदेव संपत्ती नाईकनवरे व त्याचा मुलगा सिद्धेश्वर नाईकनवरे यांच्यावर करकंब पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पांडुरंग भगवान नाईकनवरे यांनी दिली असून पुढील तपास करकंब पोलीस करीत आहेत.
पांडुरंग भगवान नाईकनवरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुरुवार दि.१० ऑगस्ट रोजी सकाळी १०च्या सुमारास बाळू तुकाराम पाटील यांनी फोनवरून देविदास नाईकनवरे हा माझ्या घराच्या समोरील रोडवर जखमी अवस्थेत पडला असून त्यांच्या डोक्याला मार लागला आहे. तुम्ही मोठी गाडी घेऊन लवकर या असे सांगताच पांडुरंग नाईकनवरे हे नानासाहेब मोरे यांची स्विफ्ट गाडी व त्यांना सोबत घेऊन बाळू पाटील यांच्या घरासमोरील पटवर्धन कुरोली आव्हे रोडवर गेले असता देविदास हा रक्ताच्या थारोळ्यात पडलयाचे आढळून आले. होता. त्याची हालचाल पूर्णतः बंद झालेली होती.सागर नाईकनवरे यांचीही ४चाकी कार तेथे आली होती.तेथे राहुल भीष्माचार्य नाईकनवरे,गणेश धनाजी मगर,भजनदास औदुंबर नाईकनवरे, संतोष वसंत घुले व इतरही काही लोक होते.यावेळी वरील चौघांनी देविदासला दवाखान्यात नेण्याकरता सागर नाईकनवरे यांच्या चारचाकी गाडीतुन पंढरपूर येथील लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये नेले आसता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मयत झाल्याचे सांगितले. यावरून देविदासचा खून हा ब्रह्मदेव आणि त्याचा मुलगा सिद्धेश्वर यांनीच केला असल्याची फिर्याद पांडुरंग नाईकनवरे यांनी दिली आहे. या फिर्यादीवरून करकंब पोलीस ठाण्यात या दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.