शहरात डेंगीचा ताप सातत्याने वाढत आहे. त्यात सर्वाधिक रुग्ण ढोले पाटील आणि औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आढळले आहेत. या दोन भागांमध्ये शहरातील ३२ टक्के डेंगीचे रुग्ण आहेत, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
यावर्षी आतापर्यंत ८६ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी २८ (३२ टक्के) रुग्ण ढोले पाटील आणि औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयांतील आहेत. शहरात पावसाला सुरुवात झाली आणि डासांची पैदास वेगाने वाढली. १६ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये ऑगस्टमध्ये ४७ रुग्णांचे निदान झाले आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. शहरात प्रत्येक दिवशी सुमारे नवीन डेंगीच्या संशयित रुग्णांची भर पडल्याचे निरीक्षण सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी नोंदविले आहे.