क्रिडा व युवक सेवा संचलनालय , महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी सोलापुर यांच्या संयुक्त विदयमाने आयोजित शहरस्तरीय शालेय फूटबॉल स्पर्धेत17 वर्षाखालील मुलींच्या गटांत बटरफ्लाय स्कूल ने अंतिम विजेतेपद पटकाविले.
नुकत्याच पार पडलेल्या सामन्यात प्रथम फेरीत बटरफ्लाय स्कूलने हरीभाई देवकरण स्कूलचा पेनल्टी मध्ये 3-0 असा पराभव करित उपांत्य फेरीत प्रवेश केला.
उपांत्य फेरी मधे सह्स्त्राअर्जुन स्कूलचा 1-0 ने प्रभाव करून अंतिम फेरीत धडक मरली.
अंतिम सामन्यत सेंट जोसेफ स्कूलबरोबर धडाकेबाज खेळ खेळत नुपुर तुगावकरने गोल करून 1-0 असा पराभव करीत विजेतेपद पटकविले.
यशस्वी संघातील खेळाडू पुढीलप्रमाणे :- कु. नुपुर तुगावकर, गायकवाड देवयानी, शेख सिमरन, पुजारी कशीश ,एकबोटे प्रियंका, बिज्जा मेघना, गणपा भावना, शेलार तनुश्री , भैरमडगी दिव्या , जिला दिशा, पुजारी वैष्णवी, पोळू वैष्णवी, खेमकर पल्लवी .
संस्थेचे अध्यक्ष ॲड. एस.आर. पाटील , उपाध्यक्ष श्री. शरद नागावकर , श्री.व्ही.जे.देवणीकर , सचिव डॉ. एस. ए. हलकुडे , खजिनदार ॲड. शंकर पाटील , सर्व विश्वस्त , प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. विजया बिराजदार ,सौ.रश्मी पर्वत यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले तर सर्व यशस्वी खेळाडूंना क्रिडा प्रशिक्षिका सौ आरती मलजी ,क्रिडा शिक्षिका कु. रफिया लंगोटे यांचे मार्गदर्शन लाभले.