घरफोडी करणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना भंडारा जिल्ह्यातील लाखनी पोलीसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. अब्दुल रहमान अन्सारी(१९) आणि मोहम्मद शाहरुख अन्सारी (३३) रा. कामठी, जिल्हा नागपूर असे अटक करण्यात आरोपीची नावे आहेत.
या चोरट्यांनी अडीच महीन्यापूर्वी आरती मिलिंद मेश्राम केसलवाडा/वाघ(फाटा) यांचे घरी घरफोडी करून १ लाख १८ हजार रुपयाचे सोन्याचे दागिने व मोबाईल लंपास केला होता. मात्र काही दिवसांनी मोबाईलचा वापर होत असल्याचे तपास पथकाचे निदर्शनास येताच पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांनी सायबर सेलची मदत घेऊन तांत्रिक तपासाचे आधारे यांना जेरबंद केल्याने अनेक गुन्ह्याचा छडा लागणार असल्यामुळे लाखनी पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.