जिल्ह्यात पूरामुळे झालेल्या धानपिकांच्या नुकसानाची पाहणी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. त्या दरम्यान लाखांदूर तालुक्यातील भाजपाचे जिल्हा किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष नूतन कांबळे यांचा वाढदिवसालाही हजेरी लावली.
यासाठी स्वत:च्या कार्यकर्त्यांमार्फत केक बोलावला आणि तो पटोलेंनी कापून त्यांचा वाढदिवस साजरा केला. याचे फोटो सोशल मीडीयावर व्हायरल झाल्यानंतर भाजपातील अंतर्गत कलहाचा फायदा घेवून नाना पटोले भाजपाच्या नेत्यांना गळाला लावणार असल्याच्या चर्चांना जिल्ह्यात पेव फुटले आहे.