नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमध्ये मांजरीचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडला. विहिरीत बिबट्या आणि मांजर आमने-सामने आल्यानंतरचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यानंतर वनविभागाने विहिरीत पडलेल्या बिबट्यासह मांजरीची सुटका केली आहे. नाशिकसह जिल्हाभरात बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढत आहे. यात अनेकदा बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनाही समोर येत आहेत. तर काहीवेळा भक्ष्याच्या शोधार्थ निघालेला बिबट्या विहिरीत पडल्याचे देखील समोर आले आहे. सिन्नर तालुक्यातील टेंभूरवाडी येथे या घटनेचा प्रत्यय आला आहे. मांजरीला पकडण्याच्या नादात बिबट्या मांजरीसह विहिरीत पडल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. मात्र, पाण्यात पडल्यानंतर मांजरीने चक्क बिबट्याच्या शेपटीचा आधार घेऊन आपला जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केला. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
Nashik News : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सिन्नरमध्ये मांजरीचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडला. यानंतर वनविभागाने विहिरीत पडलेल्या बिबट्यासह मांजरीची सुटका केली आहे. #Nashik #Sinner pic.twitter.com/pUUC6RCbn6
— PAWAR GOKUL (@TheJournalistDD) February 14, 2023