ज्या बाईक आतापर्यंत रस्त्यावर धावत होत्या, त्या लवकरच तुम्हाला आकाशात उडताना दिसणार आहेत. आकाशात उडणाऱ्या बाईकची बुकिंग सुरू झाली आहे. अमेरिकन एव्हिएशन कंपनी जेटपॅकने जगातील पहिल्या फ्लाइंग बाईकची बुकिंग घेणे सुरू केले आहे. या बाईकमध्ये 8 पॉवरफुल जेट इंजिन वापरण्यात आले आहे. मुंबईच्या वाहतूक कोंडीचा सामना करत जर तुम्हाला लोणावळ्याला जायचं असेल तर तुम्हाला किमान 2 तास लागतील. मात्र या बाईकने तुम्ही फक्त 30 मिनिटात मुंबईहून 83 किलोमीटर लांब असलेल्या लोणावळ्याला पोहचू शकता. या बाईकमध्ये 30 मिनिटांत 96 किमीचा प्रवास करण्याची क्षमता आहे.
याच्या मूळ डिझाइनमध्ये चार जेट इंजिने वापरली गेली होती, तर आठ जेट इंजिन त्याच्या फायनल डिझाइनमध्ये दिसतील. म्हणजे चारही कोपऱ्यांवर दोन जेट इंजिन वापरले जातील. जे रायडरला संरक्षण देण्यास सक्षम असेल. ही बाईक 136 किलोपर्यंतच्या बाईक रायडरसह 250 किलोपर्यंत वजन उचलण्यास सक्षम असेल.
हवेतून उडणारी ही बाईक 250mph (400 km/h) वेगाने हवेत उडण्यास सक्षम असेल.व्हिडीओ गेमसारखा असेल कंट्रोल सिस्टीम. ही बाईक हवेत उडण्यासाठी लढाऊ विमानांमध्ये फ्लाय-बाय-वायर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. हे हँडग्रिपमध्ये असलेल्या बटणांद्वारे नियंत्रित केले जाते. ज्यामध्ये एक बटण टेक ऑफ आणि लँड करायचे आहे. तर दुसरे बटण उंचीवर नेऊन स्पीड वाढवण्याचे आहे.
या बाईकचे निर्माते जेटपॅक एव्हिएशनने या बाईकसाठी बुकिंग घेणे सुरू केले आहे. कंपनीने याची प्रारंभिक किंमत 3.15 कोटी रुपये ठेवली आहे. ही बाईक येत्या दोन-तीन वर्षांत बाजारात दाखल होऊ शकते.