दुधाचे दर वाढल्यापासून म्हशीच्या दुधात जर्सी गाईच्या दुधाची भेसळ करण्याच्या घटना वाढत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे येत आहेत. या पार्श्वभूमीवर मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील आठ दूध डेअरींवर अन्न व भेसळ विभागाच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली आहे.मंगळवेढय़ातील श्रीराम मिल्क कलेक्शन सेंटर, मायाक्का मिल्क प्रॉडक्ट, विजया महिला दूध संघ, हेरिटेज फुड्स आंधळगाव, हटसन दूध डेअरी संकलन केंद्र, बोराळे आणि सांगोल्यातील अग्रणी मिल्क ऍण्ड मिल्क प्रोसेस, सुपर सूर्योदय ऍग्रो अँड मिल्क इंडस्ट्रिज प्रा. लि. मेडसिंगी, व्हीआरएस फूड्स एल.टी.डी. पारस मेडसिंग येथे छापा टाकून दूध भेसळचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.गेल्या काही महिन्यांपासून म्हशीच्या दुधात जर्सी गायीच्या दुधाची भेसळ करून 70 रुपये लिटर दराने विक्री केली जात आहे. म्हशीच्या दुधाला फॅटप्रमाणे 60 रुपये प्रतिलिटर, तर जर्सी गायीच्या दुधाला 34 रुपये प्रतिलिटर दर मिळत आहे. डेअरीचालक जादा दराच्या हव्यासाने जर्सी गायीचे दूध म्हशीच्या दुधात मिसळून ग्राहकांची फसवणूक करत आहेत. सदरची कारवाई जिल्हा दूध विकास अधिकारी डॉ. जगताप, अन्न सुरक्षा अधिकारी उमेश भुसे, केमिस्ट अधिकारी सुरेश सरडे, सहायक अधिकारी अमोल गुंडेस्वार यांनी केली आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...