भर रस्त्यात बंदूक काढून गोळ्या घालण्याची धमकी दिल्या प्रकरणी सिद्धेश्वर साखर कारखान्याचे मार्गदर्शक धर्मराज काडादी यांना पोलिसांनी आता नोटीस बजावली आहे.स्वसंरक्षणासाठी दिलेली बंदूक सार्वजनिक ठिकाणी बाहेर काढून धमकावण्याचा ठपका त्यांच्यावर आहे.
सोलापूर विकास मंच तर्फे सोलापूरची विमान सेवा सुरू करण्यासाठी उपोषण सुरू आहे आणि या उपोषणाच्या स्थळी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक काडादी यांनी बाचाबाची करून स्वतःच्या जवळ असलेली बंदूक सार्वजनिक ठिकाणी काढून धमकावली असा आरोप होता तसे व्हिडिओ देखील सोशल मीडिया वर व्हायरल झाले. सगळ्या प्रकरणांमध्ये सोलापूर शहर पोलिसांनी धर्मराज यांना नोटीस बनवलेली आहे की तुम्हाला स्वतःच्या संरक्षणासाठी दिलेली जी बंदूक होती ती सार्वजनिक ठिकाणी बाहेर काढून एखाद्याला धमकावत असाल तर ते कायद्यानुसार चुकीचा आहे. आणि त्यामुळे तुमच्यावरती कारवाई का करण्यात येऊ नये तुमच्या बंदुकीचा परवाना रद्द का करण्यातून अशा प्रकारची विचारणा नोटीसी द्वारे पोलिसांनी केलेली आहे.
काडादी यांना खुलासा सादर करण्यासाठी दहा दिवसाचा मुदत दिल्याची माहिती पोलिसायुक्त राजेंद्र माने यांनी दिली आहे. या दहा दिवसांमध्ये धर्मराज काडादी आपला कडून खुलासा काय सादर करतात हे देखील पहावं लागणार आहे. आणि या सगळ्या प्रकरणांमध्ये मुख्य प्रश्न उपस्थित केला जात आहे की पोलिसांनी गुन्हा अद्याप का दाखल केला नाही.