आजारपणाला कंटाळून चिपळूण शहरातील काविळतळी येथील एका महिलेने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याची नोंद जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
वंदना वसंत पवार (६८, रा. शिवम अपार्टमेंट, काविळतळी, दचिपळूण) असे मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबतची खबर तिच्या मुलीने चिपळूण पोलिसांना दिली. वंदना पवार यांनी आपल्या घरातील बेडरूमध्ये नायलॉनच्या साडीने आजारपणाला कंटाळून गळफास लावून घेतल्याची माहिती पोलीस ठाण्यातही देण्यात आली आहे.