येथील कीर्तनकार आणि जीजीपीएस शाळेतील क्रीडा शिक्षक, गुरुकुलचे प्रमुख किरण जोशी (वय ४८) यांचे आज दुपारी १२.४५ वाजता हृदयविकाराने निधन झाले.
उत्तम शिक्षक, कीर्तनकार म्हणून नावाजलेले आणि सामाजिक बांधिलकीने सर्वांना मदत करणारे व्यक्तिमत्त्व हरपल्याने सर्वत्र शोक व्यक्त करण्यात येत आहे.
किरण जोशी यांचा जन्म ३१ ऑगस्ट १९७५ रोजी झाला. ते जीजीपीएस शाळेत अनेक वर्षे क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत होते. शाळेने गुरुकुल सुरू केल्यानंतर गुरुकुलची जबाबदारी संस्थेने त्यांच्याकडे दिली. ते ही जबाबदारी उत्तम रीतीने सांभाळत होते. त्यांना ज्ञानप्रबोधिनीचा अध्यापकोत्तम पुरस्कार मिळाला आहे.
अनेक ठिकाणच्या उत्सवात ते कीर्तन करत. धार्मिक कार्यक्रमात पौरोहित्य करत. पावस येथील स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाशी त्यांचा निकटचा संबंध होता.
गेल्या वर्षापासून ते आजारी होते. काही महिने ते कर्करोगानेहु ग्रस्त होते.