घरफोडीतील आरोपींकडून, चोरीस गेलेले सोन्याच्या दागिनेसह 52 हजार रुपयांचा मुद्देमाल शिवाजी नगर पोलीसाकडून करण्यात आली असून या प्रकरणी 3 चोरट्यांना पोलीसांनी अटक केली आहे. 23 डिसेंबर रोजी लातूरातील पोलीस ठाणे शिवाजीनग लातूरा र हद्दीतील जुना औसा रोड भागातील एका घरात अज्ञात चोरट्यांने प्रवेश करून घरातील 52 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले या बाबत तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी निर्देशित करून महत्त्वाच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे शिवाजीनगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दयानंद पाटील यांचे नेतृत्वात पोलीस पथक नेमुन तपासा बाबत सूचना देण्यात आले होते.पोलीस पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावरून अक्षय राम तेलंगे, गोपाळ नगर, प्रशांत अर्जुन शिंदे, पाखरसांगवी प्रफुल प्रकाश पवार, राहणार गिरवलकर नगर, यांना 26 डिसेंबर रोजी ताब्यात घेऊन त्यांचेकडे गुन्ह्याबाबत विचारपूस केले. त्यांनी गुन्ह्याची कबुली देऊन गुन्ह्यात चोरलेला मुद्देमाल 52 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने काढून दिल्याने ते जप्त करण्यात आले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार शिरसाठ करीत आहेत.हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी वरिष्ठांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक दयानंद पाटील यांचे नेतृत्वातील टीम मधील पोलीस उपनिरीक्षक भगवान मोरे सहाय्यक फौजदार रामचंद्र ढगे, पोलीस अंमलदार महेश पारडे, अभिमन्यू सोनटक्के, अंगद शिरसाट, युवराज गिरी, वालचंद नागरगोजे, बालाजी कोतवाड, पद्माकर लहाने, काकासाहेब बोचरे यांनी गुन्ह्याचा कौशल्यपूर्ण तपास करून गुन्ह्याची उकल करून गुन्हा उघडकीस आणून, गुन्ह्यात चोरलेला सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल शंभर टक्के हस्तगत करण्याची कामगिरी बजावली आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...