संसदेच्या नव्या इमारतीत प्रवेश करताना सर्वांना मंगळवारी सर्व खासदारांना संविधानाच्या प्रति देण्यात आल्या. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी संविधानाच्या या नवीन प्रतिंवर आक्षेप घेतला आहे. यात राज्यघटनेच्या प्रस्तावनेतून ‘समाजवादी’ ‘धर्मनिरपेक्ष’ असा शब्द नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
यासंदर्भात खा. चौधरी म्हणाले की, संविधानाच्या नवीन प्रती काल देण्यात आल्या आहेत, ज्या त्यांनी हातात घेऊन प्रवेश केला होता. त्याच्या प्रस्तावनेत ‘समाजवादी’ ‘धर्मनिरपेक्ष’ असे शब्द आहेत. हे शब्द 1976 मध्ये घटना दुरुस्तीनंतर जोडले होते. परंतु, राज्य घटनेच्या मंगळवारी वितरित केलेल्या प्रतिंमध्या हे शब्द वगळण्यात आले आहेत. यामागचा हेतू संशयास्पद असून हा प्रकरात अतिशय हुशारीने करण्यात आलाय. हा चिंतेचा विषय असून याबद्दल आपल्याचा संसदेत बोलण्याची संधी मिळाली नसल्याचा आरोप अधीर रंजन चौधरी यांनी केला.