महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे ज्यांची भाग्यरेषा खऱ्या अर्थाने बदलली आहे अशा काही शेतकऱ्यांनी काल भेट घेतली. समृद्धी महामार्गाची घोषणा झाल्यानंतर अनेक जिल्ह्यांमधून त्याला प्रखर विरोध झाला होता. मात्र त्यातही काळाची पावले ओळखून काही शेतकऱ्यांनी आपली जमीन या प्रकल्पासाठी देण्याची तयारी दर्शवली. अशा ९ गावांतील सरपंच आणि शेतकऱ्यांनी काल माझ्यासोबत मनमोकळा संवाद साधला.
याप्रसंगी त्यांनी समृद्धी महामार्ग तयार केल्याबद्दल शासनाचे आभार मानले, तसेच आता गावातून मोठ्या शहरात जाणे अधिक सोपे झाले असल्याचे मत देखील त्यांनी व्यक्त केले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी जमीन देऊन आमच्या आयुष्यात दुप्पट समृद्धी आली असल्याचे देखील या शेतकरी बांधवांनी जाहीर केले. चार एकर शेती समृद्धीसाठी देऊन त्याबदल्यात वीस एकर शेती, घर, गाडी घेतली तसेच वार्षिक उत्पन्न देखील कैकपटीने वाढले असल्याचे त्यांनी यासमयी स्पष्ट केले. समृद्धीमधून आलेल्या पैशांतून अल्पभूधारक शेतकरी बहुभूधारक शेतकरी झाल्याचे याप्रसंगी नमूद करणाऱ्या या शेतकरी बांधवांचे तोंड यासमयी गोड करून त्यांचे मनापासून आभार मानले. याप्रसंगी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी सगळ्यात आधी जमीन द्यायला तयार झालेल्या नऊ ग्रामपंचायतींमधील सरपंच आणि शेतकरी उपस्थित होते.
Post Views: 144