लग्न झाल्यापासून आम्ही ख्रिश्चम धर्माचे आहोत. तुलाही धर्म स्वीकारावा लागेल म्हणून ख्रिश्चम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले. घरात देवपूजा, रक्षाबंधन करण्यास विरोध केला. पतीने बँक खात्यावरील दीड लाखाची रोकड, दागिने काढून घेतले. तरीही नवीन घरासाठी पैसे आणण्यासाठी छळ होत असल्याची तक्रार पूजा आकाश आनंदे (२२) या विवाहितेने पोलिसात दिली. यानुसार पतीसह दोघांविरुद्ध गुन्हा नोंदला आहे.
यातील फिर्यादी पूजा आनंदे यांनी तक्रारी म्हटले आहे की, लग्न झाल्यापासून अनेक कारणावरुन मानसिक व शारीरिक छळ केला. ख्रिश्चम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले. देवपूजा, रक्षाबंधनसारखे सण साजरे करण्यासही विरोध केला. पतीने माझ्या खात्यावरील दीड लाख रुपये आणि दागिनेही काढून घेतले. नव्या घरासाठी वडिलाकडून पैसे आणण्यासाठी छळ होत असल्याने पती आकाश शिवाजी आनंदे व सुनीता शिवाजी आनंदे यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. जोडभावी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध भादंवि ४९८ अ अन्वये गुन्हा नोंदला आहे.