(ता. दक्षिण सोलापूर) येथील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता तिसरी व चौथीतील ९ विद्यार्थ्यांनी एरंडाच्या बिया खाल्ल्या. टरफले काढल्यावर बदामासारख्या बिया लागतात म्हणून एका मुलाने आणलेल्या बिया इतर आठ जणांनी खाल्ल्या. काहीवेळाने त्यांना उलट्या होवू लागल्या आणि त्यानंतर तत्काळ त्यांना मंद्रूप येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरु असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.
दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत एका चिमुकल्याने शाळेजवळील एरंडाच्या झाडाच्या बिया खिशात घालून आणल्या होत्या. त्यावेळी त्याच्या मित्रांनी देखील त्या घेतल्या आणि फोडून खाल्ल्यावर बदामासारख्या लागतात म्हणून नऊ जणांनी त्या बिया खाऊन टाकल्या. दीड-दोन तासांनी काही मुलांना उलटी होवू लागली. त्यांना तत्काळ जवळील मंद्रूप प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.






















