स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंधेला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देशाला संबोधित करणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे संबोधन आज, सोमवारी संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या राष्ट्रीय नेटवर्कवरुन प्रसारित केले जाणार आहे. दूरदर्शनवरील सर्व चॅनेलवर सुरुवातीला हिंदी आणि नंतर इंग्रजीमध्ये प्रसारण केले जाणार आहे.
संपूर्ण देशभरात राजधानी दिल्लीपासून ते जम्मू काश्मीरपर्यत संपूर्ण देशात तिरंगा रॅली काढण्यात येत आहे. दुसरीकडे नरेंद्र मोदींनी हर घर तिरंगा अभियनातंर्गत देशवासींयाना आपापल्या सोशल मिडिया अकाउंटच्या डिपीवर तिरंगा लावण्याचे आवाहन केले होते.महत्वाचे म्हणजे, पंतप्रधान मोदींनी फक्त आवाहन केले नाही तर स्वत:च्या सोशल मिजियावरचा डीपीदेखील बदलला आहे. त्यांनी आपल्या घरावर लावलेल्या तिरंग्याबरोबर फोटो घेऊन तो www.harghartiranga.com या वेबसाइटवर अपलोड करण्यास सांगितले आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्यावर मोठा उत्सव साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने, लाल किल्ल्यावर मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. सरकारने पीएम किसान योजनेच्या लाभार्थियांसोबतच 1800 पाहुण्यांना आमंत्रण दिले आहे. याशिवाय, देशातील प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून 75 जोडप्यांना पारंपारिक वेशभूषेत आमंत्रित केले आहे.