श्री कृष्ण जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर काल मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांत आयोजित करण्यात आलेल्या विविध दहीहंडी उत्सव कार्यक्रमांना भेट दिली. यामध्ये संतोष पांडे (जांबोरी मैदान, वरळी), भाजपा आमदार राम कदम (घाटकोपर), भाजपा आमदार सुनील राणे (बोरिवली (प)), शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे (बोरिवली (पू)), भाजपा मुंबई उपाध्यक्ष प्रकाश दरेकर (दहिसर), चंदगड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख शिवाजी पाटील (हिरानंदानी मेडोज् (ठाणे)), मा. केंद्रीय मंत्री कपिल पाटील जी (भिवंडी), टेंभी नाका मित्रमंडळ (टेंभी नाका), शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (वर्तक नगर), शारदा संकल्प प्रतिष्ठान (ठाणे) आणि शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक (संकल्प चौक) येथील कार्यक्रमांचा समावेश होता.
विविध दहीहंडी कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्राच्या विकासाची आणि मुंबईच्या परिवर्तनाची हंडी प्रतिकात्मकरित्या फोडण्यात आली. मुंबईत येत्या काळात परिवर्तन घडवून सर्वसामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदलाने चांगले दिवस आणायचे आहेत. मला खात्री आहे की या चांगल्या कार्यासाठी आपल्याला प्रभू श्रीकृष्णाचा आशीर्वाद मिळेल.
गोविंदांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र सरकारने ₹10 लाखांचे विमा कवच काढले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून आपण पावसाची वाट पाहत होतो. मात्र काल सकाळपासूनच सर्व गोविंदा रस्त्यावर उतरल्यामुळे पाऊस पडत आहे. राज्याला दुष्काळाच्या संकटातून वाचवण्याची मी प्रभू श्री कृष्णाकडे प्रार्थना करतो.
महाविकास आघाडी सरकारने हिंदूंच्या सणांवर बंदी घालण्याचे पाप केले होते. महायुतीचे सरकार आल्यानंतर गेल्या 2 वर्षांपासून दहीहंडी हा हिंदू आणि मराठी सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. त्यामुळे हा साहसी खेळ खेळणाऱ्या गोविंदा पथकांमध्ये उत्साह आणि आनंद पाहायला मिळत आहे. त्याचवेळी प्रो-कबड्डीच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने प्रो-गोविंदा स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यामुळे दहीहंडी खेळाला नवी ओळख आणि प्रतिष्ठा प्राप्त झाली.
div>
Post Views: 76