सोलापूर – जैन सोशल ग्रुप फेडरेशन महाराष्ट्र रिजन आणि इनाली फाउंडेशन आयोजित मोफत इलेक्ट्रॉनिक कृत्रिम हात बसवण्याच्या शिबिराचे काम बघून अजूनही समाजात माणूसकी जिवंत असल्याचे मत अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी व्यक्त केले.
सम्राट चौक 13 पंथ भवन येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. मंदिराचे ट्रस्टी कन्नुभाई शाह चेतन सुराणा, परिमल भंडारी, गौतम छाजेड, उमेश कर्णावत, भव्य शहा, पिंकी कवाड आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना विना पवार म्हणायला की सल्ला सगळे देतात परंतु कृती खूप कमी लोकं करतात कृती करणे हे जैन सोशल ग्रुप कडून शिकण्यासारखे असून संपूर्ण तरुण वर्ग या कामासाठी सामाजिक कामासाठी वाहून घेतल्यामुळे मला याचा खूप अभिमान वाटतो असे कौतुक उद्गार त्यांनी काढले.
मोफत इलेक्ट्रॉनिक्स कृत्रिम हात बसण्याच्या या शिबिरात एकूण शंभर नागरिकांनी लाभ घेतला. कृत्रिम शाळा बसविताना त्यांना त्याचा उपयोग कसा करायचा याचा सामान्य प्रशिक्षण यावेळी देण्यात आला. शहराच्या विविध भागातून आलेले होते.
कार्यक्रमाचे प्रस्तावना चेतन सुराणा यांनी केले तर आभार परिमल भंडारी यांनी मानले तर सूत्र संचालन भव्या शाह, पिंकी कवाड यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कैलास कोठारी देवेंद्र बिराजदार सोनिया संकेश्वर सीए अमित जोशी अभिजीत शहा संजय पोरवाल अजय गांधी दिनेश जैन आदींनी प्रयत्न केले.
धनंजय विजय गायकवाड या व्यक्तीचे दोन्ही हात निकामी झालेले होते. काम करत असताना एखाद्या घटनेमध्ये त्यांचे दोन्ही हात कापावे लागले त्यामुळे त्यांना खूप त्रासदायक जीवन जगा जगत होते तर त्यांना जैन सोशल ग्रुप आणि इनाली फाउंडेशनच्या वतीने दोन्ही इलेक्ट्रॉनिक्स हात मोफत बसविण्यात आले. जे की एक तास चार्जिंग केले की ते पुढे चार दिवस चालते आणि त्यांना दैनंदिन कामे सहज करता येतात. त्या मुळे गायकवाड कुटुंब त्यांचे मनापासून आभार मानले















