शेतकऱ्यांच्या खात्यावर ब्लु सफायर फुड कडून १०० रुपयाचे वाढ बील.. सोमवार पासून रक्कम जमा होणार – डॉ उढाण
तभा वृत्तसेवा अंबड प्रतिनिधी बाळासाहेब गावडे
अंबड घनसावंगी तीर्थपुरी – ब्लू सफायर फूड प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर शंभर रुपयांचे वाढ बिल देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सोमवारपासून या वाढबीलाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याची माहिती
डॉ हिकमत उढाण यांनी दिली अंबड घनसांगी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तुमचा ऊस आपण नक्कीच गाळप करू हा दिलेला शब्द मी पाळला असून मागील वर्षीपासून शेतकऱ्यांच्या उसाचे गाळप सुरू आहे.
गळित हंगाम २०२३-२४ मध्ये झालेल्या गाळपाचे ब्लु सफायर फुड प्रोसेसिंग प्रा.ली. यांनी यापुर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यावर २७५१ रु. प्रति टन एवढी रक्कम जमा केलेली आहे सध्या शेती कामासाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे म्हनुन ब्लु सफायर फुड प्रोसेसिंग प्रा.ली. यांच्या संचालक मंडळाने वाढीव हप्ता रु.१०० प्रति मेट्रीक टन शेतकऱ्यांच्य खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे सोमवारपासुन शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा करण्यात येणार असल्याची माहिती डॉ हिकमत उढाण यांनी दिली आहे.