पंढरपूर – तालुक्यातील खर्डी येथे पंढरपूर तालुका पोलिसांची मोठी कारवाई अवैधरित्या गोणी मधील मावा मावा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य व सुगंधी तंबाखू गुटखा असा एकूण ४१ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी केला जप्त
पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांनी दिनांक २९ डिसेंबर २०२५ रोजी गोपनीय मिळालेल्या बातमीच्या आधारे अवैधरित्या मावा गुटखा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य व सुगंधी तंबाखू साठा बाबत गोपनीय बातमी मिळाल्याने पंढरपूर तालुका पोलिसांनी रेड केली असता मौजे खर्डी या गावी देशी पान शॉप या पान दुकानावर रेड करून एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे एकूण दोन
पोत्यामध्ये भरून अवैधरित्या मावा तयार करण्याचे साहित्य तसेच गुटखा तसेच सुगंधी तंबाखू असा मावा विक्रीसाठी जवळ बाळगलेल्या परिस्थितीमध्ये मिळून आला सदर ठिकाणी पोलिसांना एकूण दोन पोते मावा आणि गुटखा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य सुगंधी तंबाखू असा एकूण ४१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त करून एका व्यक्तीला ताव्या मध्ये घेतलेला असून आरोपी विरुद्ध अन्न व औषधी द्रव्य अधिनियम तसेच बी एन एस एस कलमअन्वय गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्याबाबत अन्न आणि औषधी प्रशासन विभागाचे अधिकारी श्री भुसे साहेब यांनी फिर्याद नोंदवली आहे सदर गुन्ह्यात एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आली आहे
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर, एपीआय शहाजी गोसावी, पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडणे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय तोंडले, एएसआय आबा शेंडगे, सुधाकर हेंबाडे, पोलीस अंमलदार संजय गुटाळ, विजयकुमार आवटी, हासेन नदाफ विलास घाडगे यांच्या पथकाने कारवाई केली.


























