सोलापूर – एक महिला भाविक देवीच्या दर्शनासाठी आल्या होत्या. त्यानी सोन्याचे कानातील झुबे व रोख रक्कम असे एकुण ५० हजार ७०० रुपयांचा ऐवज असलेली पर्स जीपमध्ये ठेवली होती. ती पर्स जीपमधून अज्ञाताने लंपास केला,याप्रकरणी सदर बझार पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना ३ नाेव्हेंबर रोजी पावणे तीनच्या सुमारास सिव्हिल हॉस्पिटल,महालक्ष्मी मंदिराच्या बाजूला असलेल्या पार्किंगमध्ये घडली आहे. याबाबत मंगल चंद्रकांत जानगवळी (वय ४० रा. किसान नगर,अक्कलकाेट रोड सुतमील सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगल जानगवळी या ३ नोव्हेंबर रोजी दुपारी पावणे तीन च्या सुमारास सिव्हिल हॉस्पिटल परिसरात असलेल्या महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी जीपमधून आल्या होत्या. त्यांनी जीप मंदिराच्या पाठीमागील बाजूस पार्क केली होती. त्या जीपमधील मधल्या सीटवर ५० हजार रुपये किंमतीचे कानातील झुबे व ७०० रुपये पर्स ठेवली होती. फिर्यादी दर्शन करण्यासाठी गेल्या होत्या. कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी महिलेची नजर चुकवून जीपमधून पर्स गायब केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस अंमलदार सरतापे हे करीत आहेत.
















