तभा फ्लॅश न्यूज/सोलापूर : तिसऱ्या श्रावणी रविवारचे औचित्य साधून ६८ लिंग भक्त मंडळ आणि वीरशैव व्हिजनच्या संयुक्त विद्यमाने ग्रामदैवत शिवयोगी श्री सिध्दरामेश्वरांनी पंचक्रोशीत स्थापन केलेल्या ६८ लिंग पदयात्रा ‘हर्र बोला हर्र…’ च्या जयघोषात काढण्यात आली. राज्यातील महिला व मुलींच्या संरक्षणाबरोबरच सोलापूरच्या सुख, शांती आणि एकात्मतेसाठी साकडे घालण्यात आले.
ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांची आरती व पूजन करून पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला तर पदयात्रेचा समारोप श्री मल्लिकार्जुन मंदिर येथे आरती व पूजन करून करण्यात आला. पदयात्रेच्या मध्यंतरात चाटी गल्ली येथील बुबणे जैन मंदिर येथे आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी यांच्यातर्फे फराळ व चहापान देण्यात आले. पदयात्रा समारोपाच्या ठिकाणी शांतविर भजन मंडळाचे अध्यक्ष मल्लेश पेद्दी यांच्या वतीने फराळ देण्यात आले.
Post Views: 14