मुखेड :-
येथील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या करियर कट्टा विभाग व मराठी विज्ञान परिषद व जिल्हा परिषद , नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय करियर मार्गदर्शन व समुपदेशन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.बी.अडकिणे आणि प्रमुख मार्गदर्शक ग्रामीण तंत्रनिकेतन महाविद्यालय , नांदेडचे उपप्राचार्य डॉ. ओमप्रकाश दरक व प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.एस.बी.बळवंते हे उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. संतोष शेंबाळे तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ. शिवसर्जन टाले व पाहुण्यांचा परिचय प्रा.भालचंद्र गांजरे यांनी करून दिले .
मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले . प्रमुख मार्गदर्शनात डॉ. दरक यांनी विद्यार्थी हा समाजाला समतोल राखणारा जीव आहे . दहावी , बारावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर डॉक्टर , इंजिनिअर होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिल्यास न खचता विविध कौशल्यात्मक शिक्षण घेऊन आवडीच्या क्षेत्रात पदार्पण करण्याची संधी आहे