टेंभूर्णी – माढा तालुक्यातील पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बळजबरी करून अत्याचार केलेले चित्रीकरण सोशल मीडियावर करतो म्हणून अत्याचार करणारे दोघे त्यांना साथ देणारा संशयित अजिंक्य संगीतराव यांचेसह पाच जणांविरुद्ध पोस्को आणि ॲट्रोसीटी अंतर्गत टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.असून संशयित
निखील सुधीर लांडगे रा. दहिवली ता माढा, संशयित अमोल धनाजी गरड, रा. उपळवाटे ता माढा, संशयित शाहिद बाबा मुलाणी रा. उपळवाटे ता माढा, संशयित ॲड अजिंक्य संगीतराव रा. टेंभुर्णी संशयित तात्या शामराव जगताप रा. दहिवली ता माढा या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे
पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उपळवाटे ता.माढा येथील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर 20/09/2025 संशयित आरोपी निखील लांडगे व शाहीद मुलाणी यांनी बळजबरीने शाररीक संबंध करून त्याचा त्याचे मोबाईल मध्ये व्हिडीओ काढला तसेच ” जर कोणाला काही सांगीतल तर तुझा व्हिडीओ व्हायरल करेण” अशी धमकी देवून मला मारहाण केली.व कोणाला सांगितले तर जीव मारण्याची धमकी दिली. मात्र या नंतर अजिंक्य संगीतराव असल्याचे निखील कडून मला समजले. ॲड अजिंक्य संगीतराव याने व्हिडीओ कॉल मध्ये “मी वकील आहे, आपल्या पाठिमागे मोठे नेते आहेत, मी तुला काही होवून देणार नाही” असे म्हणत मला तु घरी काही सांगायचे नाही, नाहीतर तुमचे काही खरे नाही अशी धमकी दिली.यावेळी
07/11/2025 रोजी टेंभुर्णी येथून बाजार घेवून उपळवाटे कडे स्कुटीवरून जाताना दहिवली ओढ्या पाशी संध्याकाळी 08/00 वा चे सुमारास पांढ-या रंगाच्या क्रेटा गाडी क्रमांक एम एच 45 ए झेड 0555 हि गाडी आढवी लावून त्यातून संशयित निखील लांडगे व त्याचे सोबत संशयित ॲड अजिंक्य संगीतराव व तात्या जगताप खाली उतरले. निखील अजिंक्य संगीतराव व तात्या जगताप यांनी मला तु निखील चे का ऐकत नाही असे म्हणून अजिंक्य संगीतराव त्यातील तात्या जगताप निखीलने शरीरास झोंबाझोंबी केली.संगीतराव याने जातीवाचक शिवीगाळ करीत तुला सांगीतलेल कळत नाही का, असे बोलून माझे सोबत लज्जास्पद बोलले यावरून
टेंभुर्णी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी निखील सुधीर लांडगे रा. दहिवली ता माढा,अमोल धनाजी गरड, रा. उपळवाटे ता माढा,शाहिद बाबा मुलाणी रा. उपळवाटे ता माढा, ॲड अजिंक्य संगीतराव रा. टेंभुर्णी तात्या शामराव जगताप रा. दहिवली ता माढा या पाच जणांविरुद्ध कलम 65 (1), 64(2)(M), 74, 75(2), 78(1), 126(2), 115(2), 351(2), 352, सह पोक्सो कलम 4(2), 8, 12 सह अनुसूचीत जाती व अनुसूचीत जमाती अत्याचार प्रतिंबंध अधिनियम 1989 चे कलम 3(1) (r) (s), 3(1)(w)(i),3(2) (va) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे याप्रकरणी सर्व आरोपी पसार झाले असून त्यांना पकडण्यासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत.
या घटनेने टेंभुर्णी परिसरात चर्चेला उधाण आले असून अशा मस्तवाल आरोपींच्या मुसक्या आवळण्याची मागणी महिला आणि नागरिकांतून होत आहे. नाहीतर अशाच प्रकार पुन्हा झाल्याशिवाय राहणार नाही असे सर्वसामान्य नागरिकातून बोलले जात आहे

















